Wednesday, December 3, 2014

अंगरक्षक

"साहेब, इथे २ मृतदेह सापडले आहेत..." हवालदार बोलला तर इन्स्पेक्टर राहुल वॉकी टोकि (walky-talyky) ठेवून पळत पळत त्या जागेवरती पोहचला. "पाण्यामध्ये राहिल्या कारणामुळे देह एवढा फुगला आहे कि नीट ओळखणं पण कठीण आहे..." राहुल तिकडे पोहो
चताच हवालदार बोलला. हे एकदम स्पष्ट माहिती पडत होतं कि एक मृतदेह मुलीचा आहे आणि दुसरा कोणा मुलाचा.

"ह्म्म्म... एक मृतदेह तर इन्स्पेक्टर संतोषचा वाटत आहे. हाताच्या ट्याटू (tatoo) वरून वाटतं. वाटतंय संतोषच्या केसशी ह्याचं काही घेणं देणं आहे. घेवून चला ह्यांना मुर्दाघरामध्ये, बघूया ह्याचं काय करू शकतो ते". राहुल बोलला आणि परत आपल्या जीप मध्ये बसून पोलीस स्टेशन निघाला.

२ दिवस आगोदर

"ऐक रे... तू कमीशनर (Commissioner) असशील स्वतःच्या घराचा. तुला एकदा सांगितलं ना कि उद्या मनीषला एका बंदिगृहातून दुसऱ्या बंदिगृहात शिफ्ट करायचं आहे, तर मान्य कर ना."

"हि धमकी तू कोणा दुसऱ्याला दे. जर मी असल्या धमक्यांना घाबरणारा असलो असतो तर कधीच पोलीस फोर्स जॉईन नाही केली असती. मला माहित आहे कि तुम्ही मनीषला शिफ्ट ह्या कारणासाठी करत आहात कि रस्त्यामध्येच त्याला फरार करू शकाल. मी जेव्हा पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत तर हे होणार नाही."

"स्वतःचा नाही तर स्वतःच्या १९ वर्ष्यांच्या मुली बद्दल तरी काही विचार कर कमीशनर (Commissioner). मुंबईसारख्या शहरात तर तिला पाठवलं आहेस, पण तिची रक्षा कशी करणार? चल डील करूया, तुझ्या मुलीच्या जीवाच्या बदली मध्ये मनीषच्या शिफ्टिंगचा ओर्डर. मान्य आहे?"

"मला काहीच मान्य नाही आहे. आणि राहिला प्रश्न माझ्या मुलीचा, ती एकदम सुरक्षित आहे. मीने पण काही कच्चा खेळ खेळला नाही आहे."

"ठीक आहे, मग परत उद्या सकाळी १० वाजता फोन करेन. आशा करतो कि तेव्हा पर्यंत तू सगळे पेपर्स तैयार करून ठेवशील मनीषच्या शिफ्टिंगचं " आणि फोन कट झाला.

कमीशनर (Commissioner) ने फटाफट एक नंबर फिरवला, "संतोष.... सगळं काही ठीक आहे ना तिथे.... आज आक्रमण होवू शकतं. माझ्या मुलीला माझ्या पर्यंत पोहचवण्याची जबाबदारी तुझी आहे"

"सगळं काही एकदम ठीक आहे. ती माझ्या नजरेसमोरच आहे साहेब. मी तिला घेवून मुंबईला परत येतो." संतोष बोलला आणि फोन कट केला. कमीशनर (Commissioner) ने पुन्हा एक नंबर फिरवला.

"हेल्लो... बेटा.. कशी आहेस तू.. आणि हा आवाज कसला आहे"

"पप्पा मी मित्राच्या पार्टी मध्ये आहे. आपण नंतर बोलू"

"बेटा मी काय बोलतोय ते लक्ष्य देवून नीट ऐक... तुझ्या जीवाला धोका आहे. माझा एक इन्स्पेक्टर तुझ्या जवळ येईल आणि लवकरच तुला घेवून तो परत इथे येणार. इन्स्पेक्टरच नाव संतोष आहे. जपून राह."

"काय पप्पा तुम्ही पण. छोट्या छोट्या गोष्टींवर चिंतीत होता... काहीच नाही होणार मला.."

"जसं मी सांगतो तसं कर बस. मला पुढे काही ऐकायचं नाही आहे." कमीशनर (Commissioner) बोलला आणि फोन कट केला. "हि आज कालची मुलं... हा विचार करतात कि ह्यांचे आई वडील वेडे आहेत. एवढी महत्वपूर्ण गोष्ट आहे आणि ह्या मुलीला पार्टीची पडली आहे." तो आपल्या बायकोशी बोलला.

दुसरीकडे मुंबई च्या एक भरपूर प्रसिद्ध डिस्को मध्ये मानसीचा पार चढला होता. "यार... हि तर हद्च झाली, कोणत्यापण छोट्या मोठ्या क्रिमिनल च्या धमक्यांना घाबरून माहित नाही पप्पा माझ्या जीवनात का अडचणी टाकतात. कधी इथे शिफ्ट करतात तर कधी तिथे. हेच कारण आहे कि ह्या वयात पण आज पर्यंत माझा कोणी बॉय फ्रेंड नाही बनला."आपल्या केसांना पाठी करत आणि वोडकाचा सिप घेत मानसीने प्रियाला सांगितले.

"अरे.. बोलत आहेत म्हणजे काही महत्वपूर्णच असणार. चिंता नको करूस सगळं काही ठीक होईल.. तो बघ तो सुंदर मुलगा फिरत आहे, जो काही दिवसांपासून तुझा पाठलाग करत आहे" प्रिया बोलली तर मानसी ने तिच्या इशाऱ्याकडे बघितले जिथे तो मुलगा उभा होता. एकदम कसरती शरीर, छोटे छोटे केस, डोळ्यांवरती एवढ्या रात्रीपण काळा चष्मा आणि हलक्या मिश्या. त्याला आपल्या जवळ येताना बघताच मानसीच हृदय जोर जोरात धडधडायला लागलं.

"मानसी... मी इन्स्पेक्टर संतोष... आपल्या कडे वेळ भरपूर कमी आहे. लवकर माझ्या बरोबर चल."

"मला कुठेच नाही जायेचे आहे" मानसी त्याला बोलली.
"वेळ नाही आहे मानसी, मला हेल्पलेस नको करूस" तो तिच्या अजून थोडं जवळ होवून बोलला. तेव्हा एक गोळी चालली आणि संतोषच्या कानाच्या जवळून निघून गेली आणि पाठी ठेवलेल्या बाटल्यांना लागली. सगळ्या डिस्को मध्ये गडबड सुरु झाली. "बघितलं... लवकर उठ" संतोष बोलला आणि मानसीचा हाथ पकडून तिला पाठीच्या दरवाज्याच्या इथे खिचायला लागला. त्याने आपल्या शर्टातून एक बंदूक पण काढली होती. जसे ते बाहेर आले तर संतोष ने पहिल्यापासून इथे आणलेली आपली लैंड लोवर कडे निघाला. तेव्हा पायांचा आवाज आला आणि संतोष ने मानसी ला चावी देत बोलला, "हि घे चावी, गाडीला वळवून इथे घेवून ये. मी ह्या लोकांना थांबवतो." मानसी चावी घेवून गाडीच्या दिशेने पाळायला लागली आणि संतोष जवळच पडलेल्या एका लोखंडाच्या बोर्डाच्या मागे जाऊन लपला. तेव्हा त्याने बघितले कि समोरून २ लोकं पळत पळत येत आहेत. निशानेबाजी मध्ये संतोष निपुण होता. त्यांना निशाणा साधला आणि ठीक त्या दोघांच्या डोक्याच्या मधोमध एक एक गोळी मारली. दोघेही जागच्या जागीच मेले. तेव्हापर्यंत मानसी पण गाडी घेवून आली होती. त्याने लवकर मानसीला प्यासेंजर (Passenger) सीटवर जायचा इशारा केला आणि तिच्या शिफ्ट होताच त्याने स्वतः गाडीचा ताबा घेतला आणि गाडी भरधाव पळवली.

ते थोड्या अंतरावरती गेले होते कि तेवढ्यात संतोष ने आपला फोन उचलला आणि एक नंबर फिरवला, "मानसी माझ्याबरोबरच आहे. आम्ही लवकरच पोहचू." तो बोलला आणि फोन कट केला. नंतर गाडी मध्ये ठेवलेल्या वॉकी टोकि (walky-talyky) ला ट्यून करू लागला, "त्या गुंडांनी मोबाईल एवजी वॉकी टोकि (walky-talyky) वापरायचं उचित समझल कारण मुंबईचा एरिया जास्त नाही आहे. नशिबाने मी त्यांची फ्रिक्वेन्सी पकडू शकतो आणि मला माहिती पडणार ते आपला कुठे लपून वाट तर नाही बघत आहेत." त्याचं एवढं बोलणच होतं कि एक सिग्नल पकडायला लागलं.

"पुलाजवळ गाड्या उभ्या करा. कोणती पण गाडी जाऊ देवू नका. आम्हाला कोणत्या हि परीस्थित मानसी पाहिजे." एक जोरदार आवाज ऐकू आली.

"ओह नो. वाटतंय आपण फसलो आहे. मला गाडी कच्च्या रस्त्यावर घ्यायला पाहिजे. कारण आपण ह्या हिल च्या टोकावरतीच आहोत, ह्याच्यामुळे जास्त परिणाम नाही होणार, पण ती जागा पक्का उबड खाबड असणार. एकदम घट्ट पकड. तुला काही ईजा झाली तर माझी नोकरी जाणार" संतोष बोलला.

मानसी इतक्या वेळेपासून फक्त संतोषलाच बघत होती. ती विचार करत होती कि ज्या माणसाला मॉडेल व्हायला पाहिजे, तो पोलिसाची नोकरी करत आहे. बघूनच माहिती पडतं कि संतोषला व्यायामाची आवड आहे. त्याचे मोठे मोठे बळकट स्नायू बघून कोणतीही मुलगी त्याच्यावर एका क्षणात फिदा होईल, तर मानसी का नाही होणार. तिने आपली सीट बेल्ट बांधली आणि बोलली, "तुम्ही एवढ्या रात्री पण चष्मा का लावता?"

"म्याडम (madam) हि दुनिया खूप खराब आहे. काहीच माहिती नाही पडत कि कोणाचं हृदय गोरं आणि कोणाचं काळ. कोणाकडून धोका खाण्याहून चांगलं आहे सगळेच काळे दिसो. कमीत कमी माणूस सावध तरी राहील."

"अच्छा.. तर मी पण तुला काळीच चांगली वाटते काय.."

"असली काहीच गोष्ट नाही आहे म्याडम.. घ्या चष्मा काढून टाकतो आपला." तो बोलला आणि चष्मा काढून टाकला. "आणि ह्या मिश्या आणि दाढी आणि मेकअप मास्क पण" ती बोलली आणि त्याने हे सगळं पण काढून टाकलं.

"हा खरा चेहरा न दाखवणं पण काही फंडा आहे काय...?"

"म्याडम प्रत्येक मनुष्याची एक स्वतःची जीवन शैली असते. पोलिसांची ३/४ जीवन असंच नोकरी करता करता संपून जाते. मला असं नाही पाहिजे कि गुंडे मला माझ्या बाकीच्या जीवनात सतवायला आले पाहिजे. एकदा कोणी चेहरा ओळखला जर कुठे पण लपलो, तर येतातच दरवाजा ठोकवायला." तो बोलला तर मानसी हसायला लागली.

"तसं तू खूप इंटरेस्टिंग आहेस..." आत्ता तीच बोलणं संपलं पण नव्हतं कि संतोष ने गाडी कच्च्या रस्त्यावर उतरवली. गाडीला भरपूर झटके लागत होते आणि मानसी ने खिडकीच्या वरच्या ह्यांडलला घट्ट पकडलं होतं. काही अंतर गेल्यावर जेव्हा समतल जमीन आली तर संतोष ने गाडी थांबवली आणि हेडलाईट बंद केली.

"बाहेर या म्याडम. वाटतंय आजची रात्र इथेच घालवावी लागेल."

"का... आपण इथून जाऊ का नाही शकत..."

"जाऊ तर शकतो पण फक्त उलट, हि जी नदी इथे वाहते आहे ना, हिला पार करण्यासाठी त्या ब्रिज वरून जाणे गरजेचे आहे. तिथे आपली वाट ते बघत आहेत. रात्र इथेच घालवायला लागणार."

"चला चांगलंच आहे... खुल्यामध्येच राहू.... पण इथे किती गारवा आहे. चल आग जळवूया."

"आग जळवून आपली पोजिशन त्यांना सांगूया... तुम्ही आराम करा... हे विचार करायचं काम माझ्यावर सोपवून द्या. मी करेन जे काही करायचे आहे ते."

"पण ह्या गारव्याच काय करू....." मानसीला फक्त बहाणा पाहिजे होता संतोषला बहुपाश्यात घेण्याचा.

"गाडी मध्ये एक गोधडी आणि तुझी आवडती वोडका आहे, त्याला पी आणि गोधडी मध्ये शिरून जा. गारवा पळून जाईल."

"आणि तुम्ही...?"

"आमचं काय आहे म्याडम.... सरकारी नोकर आहोत... गरव्यामध्येच पडून राहू... खरं तर मला झोपायचं पण नाही आहे रात्रभर... इथे माझा डोळा लागला, आणि तिथे ते गुंडे येवून काय खेळ खेळतील माहिती पण नाही पडणार..."

"तुम्ही कोणा वरती पण विश्वास नाही करता ना.."

"बिलकुल कोणा वरती पण नाही... जमानाच असा आहे. ज्याच्यावर विश्वास करा, तोच गोळी मारतो." संतोष ने गोधडी आतमधून काढली आणि वोडकाची बाटली पण. नंतर नाईट विजन दुर्बीण काढून बघायला लागला, "आत्ता तर रस्ता साफ आहे. लांब लांब पर्यंत तर कोणी नाही आहे. फक्त काही तासांचा अवधी आहे, फक्त काही अडथळा नाही आला पाहिजे." मग त्याने फोन उचलला आणि परत एक नंबर दाबला. "आम्ही ब्रिज पासून लांब आहोत. माझा निर्देशांक नोट करा. पिकअप पाहिजे मला लवकरात लवकर" आणि काही नंबर सांगायला लागला. "हो, दिवस होण्याचीच वाट बघायला लागणार" आणि फोन कट केला.

"तर सकाळ पर्यंत आपण दोघे इथेच राहणार काय ह्या जंगलात... एकट??"

"हो.. आणि काही उपाय पण नाही आहे. तुम्हाला भीती तर वाटत नाही आहे ना...!"

"नाही... मला विश्वास आहे कि तू माझी रक्षा करणार. शेवटी पप्पाने काही विचार करूनच तुला माझा अंगरक्षक बनवला आहे."

"हो हो... अंगरक्षक बनंव आत्ता... चल आत्ता हि गोधडी घे अंगावरती. जर तुला सर्दी जरी झाली तरी माझं काही खैर नाही." संतोष बोलला..

"तू कधी पर्यंत असंच लक्ष देत राहणार... येवून माझ्या जवळ बस ना. शीर तू पण ह्या गोधडी मध्ये." वोडकाच्या सिप घेत मानसी बोलली.

"जर तुझ्या पप्पांना समझल ना म्याडम... तर मला कायमस्वरूपी थंड करून टाकतील. मी इथेच ठीक आहे."

"अरे ये ना... कोण सांगणार पप्पांना? तू कि इथली शांतता? मी तर नाही सांगणार..." मानसीच्या किती तरी आग्रहानंतर संतोष तिच्याबरोबर त्या गोधडीत शिरला. त्या दोघांनी आपली पठाण एका झाडाशी टेकवली होती आणि गोधडी ओढून ते नदी कडे पाहात होते. नदीच्या पाण्याचा वेग खूप होता.

"तुला कधी भीती नाही वाटत ह्या नोकरीमध्ये?" त्याच्या शरीराचा स्पर्श भेटला म्हणून मानसीला मजा येत होती.

"भीती त्यांना वाटते ज्यांना स्वतःवरती विश्वास नसतो. माझ्या बरोबर असं काहीच नाही आहे. ड्युटी करतो आणि आपलं घर चालवतो"

"कोण कोण आहे तुझ्या घरात..."

"कोणच नाही आहे... एकटा आहे, आणि खुश आहे" मानसीच्या सारखं सारखं वोडका त्याच्या समोर करण्यामुळे त्याच पण मन होत होतं आणि त्याने पण एक मोठा सिप मारला होता.

"कशी बायको पाहिजे तुला" मानसी त्याच्या अजून जवळ होत बोलली. आत्ता ती त्याला एकदम चीपकली होती.

"कधी विचार नाही केला म्याडम आणि प्लीज थोडं श्वास घेण्यासाठी तरी जागा सोडा. माहिती आहे गारवा आहे, एका अनोळखी मुलीच्या एवढ्या जवळ होणं चांगलं नाही वाटत."

"हा हा हा... बाल ब्रह्मचारी टाईप आहे म्हणजे. अरे कधी तरी असं करशीलच... माझ्यामध्ये काय वाईट गोष्ट आहे...."

"वाईट गोष्ट तर नाही आहे, रिस्क भरपूर आहे इथे. माझ्या नोकरीचा रिस्क, आपल्या जीवाचा रिस्क. बस चुपचाप हि पी आणि झोपून जा..." संतोष ने बाटली परत तिच्या जवळ देत बोलला... मानसी तर पहिल्या पासून टुन्न झाली होती. आणखी पिऊन कधी तिचा डोळा लागला, तिला माहितीपण नाही पडलं. जेव्हा सकाळी तिची झोप उडाली तर तिच्या अंगावरती गोधडी बरोबर संतोषच ज्याकेट पण पडलेलं बघितलं, परंतु तरीपण तिची थंडी नाही जात होती. संतोष पण तिच्या जवळ नव्हता. तिने तिची नजर इकडे तिकडे फिरवून बगितलं तर संतोष लांब उभा दुर्बीण घेवून काही तर बघत होता. ती उभी झाली आणि आपले कपडे झाडायला लागली. काही क्षणातच संतोष तिच्याजवळ आला.

"तुम्ही तर एकदम कुंभकर्णासारखी झोपता म्याडम... ११ वाजले आहेत. मला लांबून एक बोट येताना दिसत आहे. कदाचित तुम्हाला घ्यायला पाठवली असेल. वाटतंय काम झालंय.."

"चला चांगलं झालं... हा एवढा घाणेरडा वास कुठून येतोय?"

"माहिती नाही... कदाचित आजू बाजूला कोणी जनावर मेला असेल. त्याचंच असणार... नदीवर जाऊन आपलं हाथ पाय धुवून घ्या...."

"आपण अजून पर्यंत निघालो का नाही... आपण गाडीमध्ये बसून सुद्धा जाऊ शकलो असतो..."

"गाडीचा टायर पंक्चर झाला आहे. जसं मी सांगतो तसं कर प्लीज... जास्त वेळ नाही आहे." संतोष एवढं बोलला तर मानसी पळत पळत नदी कडे गेली आपले हाथ पाय धुवायला. तेव्हा तिने बघितले कि एक बोट तिच्याकडे येत आहे. दिसायला तर मोटरबोट सारखी दिसत होती पण आवाज बिलकुल नव्हता... तिने थोडावेळ वाट बघितली पण जस जशी मोटरबोट जवळ येत गेली, तिच्यामध्ये भीती वाढत गेली. त्या मोटरबोटीच्या समोर काळे कपडे घालून काही गुंडे टाईपचे लोकं उभे होते, ज्यांच्या हातामध्ये मोठ मोठ्या बंदुका होत्या. ती पळत परत आली आणि सगळं काही संतोषला सांगितलं.

"घाबरू नकोस मी आहे ना. बस माझ्या बरोबर राह. सगळं काही ठीक होईल."तो बोलला आणि आपली बंदूक काढली. दोघेही झाडाच्या मागे लपून मोटरबोटच्या जवळ येण्याची वाट बघत होते. "माझ्या पाठी पाठी ये... माझ्या खांद्यावरती हाथ ठेव जेणेकरून तू माझ्यापासून वेगळी ना होवो." तो बोलला आणि हळू हळू झाडाची आड घेवून मानसीला नदीच्या जवळ घेवून जात होता. आत्ता मोटरबोट पोहोचली होती, त्यामधून ते भीमकाय ४ माणसं खाली उतरली आणि त्यांच्याबरोबर एक सफेद कपडेवाला माणूस पण खाली उतरला. मानसी आणि संतोष त्या लोकांच्या एकदम जवळ येवून पोहचले होते. संतोष ने मानसीचा हाथ पकडला आणि तिला खेचत लवकर त्या लोकांकडे घेवून गेला.

"वेलकम रवी आम्हाला पूर्ण विश्वास होतं कि तू आमचं काम जरूर करशील.."

"काम झालं आहे... पैसे कुठे आहेत..." संतोष बोलला, मानसीचा हृदय तिच्या कंठाशी येवून पोहचला होता.

"हे घे पैसे... पूर्ण ५ लाख रुपये आहेत.... जशी डील झाली होती..." त्या माणसाने नोटांनी भरलेली पिशवी संतोषला देत बोलला...

"आणि हि घे मुलगी... जसं डील झाली होती."

मानसी निशब्ध उभी होती... राहून राहून तिच्या डोक्यात संतोषने बोललेली गोष्ट येत होती,
"म्याडम (madam) हि दुनिया खूप खराब आहे. काहीच माहिती नाही पडत कि कोणाचं हृदय गोरं आणि कोणाचं काळ. कोणाकडून धोका खाण्याहून चांगलं आहे सगळेच काळे दिसो. कमीत कमी माणूस सावध तरी राहील."

"हिचा बाप जेवढं विचार केलं होतं, त्याहूनही जास्त फट्टू निघाला. मनीषला सकाळी ९ वाजताच शिफ्ट करायचा प्लान बनवला. ठीक १०.३० ला आम्ही त्याला फरार पण केला. आत्ता हिची आम्हाला काहीच जरुरत नाही आहे. हिला परत सोडून ये." तो माणूस बोलला. त्याच्याबरोबरचे गुंडे संतोषच्या गाडीमधून काही तरी काढत होते.

"परत तर नाही सोडू शकत हिला... आज पर्यंत पोलिसांपासून वाचत आलो आहे कारण हा चेहरा कोणीच नाही पहिला आहे. पण हि मुलगी तर पूर्ण खेळच बिघडवून टाकेल."

"तर हिचं काय करायचं ते कर..."

"प्लीज मला सोडून द्या... मी कुणालाच काही नाही सांगणार... प्लीज.... मी तुमच्या पुढे हाथ जोडते..."

"मी पहिलेच बोललो कि मी कोणावरती पण विश्वास नाही करत" मानसीच्या डोक्यात परत तेच शब्द फिरले, "जमानाच असा आहे, ज्याच्यावर विश्वास करा, तोच गोळी मारतो..." आणि ह्याच्या अगोदर ती काही बोलेल किंवा करेल, एक जोरदार आवाज आला आणि तिच्या डोळ्यांच्या मध्ये येवून एक गोळी लागली. ती तिथेच पडून मेली... "तुमच्या गुंडांनी माझ्या गाडीमधून संतोषचा पण देह काढला असेल, दोन्ही देहांना नदी मध्ये फेकून द्या... जेव्हा पर्यंत किनाऱ्या वरती येईल तोपर्यंत मी ह्या देशाच्या बाहेर असेन..." एवढं रवी बोलला आणि नोटांची पिशवी घेवून तो आपल्या गाडी कडे निघाला.


समाप्त

No comments:

Post a Comment

Pragya Jaiswal is making temperatures soar with her glamorous avatar

Actress Pragya Jaiswal is teasing fans with her pictures. Pragya, who is a known face in Telugu film industry, has undergone a major tran...

A